home

Thursday, 19 May 2016

ज्ञानरचनावादी साहित्य

ज्ञानरचनावादी साहित्य



⚽⚽ज्ञानरचनावादी साहित्य ⚽⚽
ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :-
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
📚सनशाईन शिट
📚फेविकाॅल हिटेक्श लोशन
📚झाकणे
📚प्रकल्पासाठी चित्र , कागद
📚तक्ते
📚वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक पिशव्या
📚प्लास्टिक बॉक्स
📚पणत्या , सुगडे
📚रंगीत खडे
📚गारगोट्या
📚कापुस
📚लोहचुंबक
📚भिंग
📚दुर्बीण
📚सेल , बल्ब
📚कंचे
📚पेंट,ब्रश ई.
📚सोलर पॉवर
📚छोटी मोटार
📚थर्माकोल च्या गोळया
📚लेस
📚टाचण्या
📚स्टेपलर
📚धान्य, पदार्थ नमुणे
📚पंचिंग , टोच्या, लेस
📚शेंगांची टरफले
📚पाण्याच्या रिकाम्या बाटल्या
📚वाळलेले भोपळे
📚विविध बिया
📚डबे
📚 माऊंट बोर्ड
📚ड्रॉइंग पेपर
📚 प्रकल्प पुस्तके
📚 चार्ट , चित्र
📚 थर्माकोल शीट
📚 फाईल
📚 फेविकॉल
📚कटर
📚 कात्री
📚 वेल्वेट कापड
📚 दाब पिन
📚 मार्कर पेन
📚 स्केच पेन
📚 पट्टी
📚नोटा सत्यप्रती
📚 डिंक
📚रंग - ब्रश
📚 चिकट टेप , रंगीत टेप
📚 वेगवेगळ्या आकाराचे बटण , ग्लास,   
     डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या,
     स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास , कापड ,
📚 गोट्या
📚वर्तमान पत्र रद्दी
📚 स्टिकर
📚प्लास्टर अॉफ पँरीस
📚खळ
📚 पताका कागद
📚 मार्बल पेपर
📚काचेच्या पट्या
📚 बांगड्या
📚 बांगडीच्या काचा
📚मेणबत्या
📚काडेपेट्या, व काड्या
📚 खोके
📚 सुतळी , तंगुस
📚 चित्रकला वही , पुस्तक
📚कार्यानुभव वही , पुस्तक
📚पोस्टकार्ड
📚बाभळीच्या शेंगा
📚मोजपात्र
📚चंचुपात्र , परिक्षा नळ्या
📚 स्प्रे पंप बाटली
📚खेळणी, प्राणी , वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल
📚चिमटे
📚नारळ , करवंट्या
📚कला , कार्यानुभवासाठी साहित्य
 व इतर आनुषंगिक साहित्य.
१) भाषा
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
अक्षरकार्ड
शब्दकार्ड
शब्दपट्टया
वाक्यपट्टया
स्वरचिन्हाधारीत शब्द
जोडशब्द
कविताफलक
 इंग्रजी अक्षरे
मराठी-इंग्रजी वाक्ये
 व इतर आनुषंगिक साहित्य.
💈💈इंग्रजी💈💈
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
🔆इंग्रजी अक्षरे
🔆 मराठी-इंग्रजी वाक्ये
🔆Singular-plural
🔆 Verb form
🔆 Word Hanger
🔆 Related words
🔆 Rhyming words
🔆 Synonymous
🔆 Antonyms
🔆 Capital-Small letters A,B,C,D
🔆 Word formation
        And some essential
   
३)गणित
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
संख्याकार्ड
अंककार्ड
भौमितीक आकार
लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा
नाणी -नोटा
घड्याळ
चित्र स्टँम्प
बेरीज- वजाबाकी मॉडेल
मनी माळा
उजळणी अंकात - शब्दात
चिन्ह +  -  × ÷ = <  >
रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा
दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे
वर्ग व वर्गमुळ
अंक १
लहान-मोठे संख्या
 व इतर आनुषंगिक साहित्य
🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र..

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र..



अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र........
प्रिय  गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा
कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो
एक साधूचरित पुरुषोत्तम
ही स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
असतात टपलेले वैरी , 
तसे जपणारे  मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला
आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला ,
पाहू दे त्याला ,
पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
फसवून  मिळालेल्या यशापेक्षा ,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना,
आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
त्याला सांगा ................
भल्याशी भलायीन वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
आणि म्हणावं त्यालाआसवांची   लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्याना   तुच्छ   मानायला ,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्या शिवाय लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोललो आहे  _
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा,
भलताच गोड छोकरा आहे हो तो.

Monday, 2 May 2016

आयकर विषयक माहिती

आयकर विषयक माहिती


आयकर विषयी विशेष माहिती 


आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काही नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.

1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज  व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,
राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty  इत्यादी .
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात

आयकर इतर सवलती 


1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची  करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना  30,000रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च आता 50,000 ऐवजी 75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी 1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वया पेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणे आवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.

अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो

PPT कशी बनवावी ?

PPT कशी बनवावी ?

संगणकावर PPT कशी बनवावी ?

1) प्र थम MS Office ओपन करुन power point ओपन  करा 


2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा 


3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका 


4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा 


5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल 


6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा 


7) आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता 


8) आता आपण अॅनिमेशन देऊ
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला  अॅनिमेशन द्या अशा
  प्रकारे अनेक स्लाईड तयार करा
      

यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता


Sunday, 1 May 2016

विद्यार्थी योजना

विद्यार्थी योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना :

अ. क्र.
योजनेचे नाव
वर्ग
निकष




1
उपस्थिती भत्ता
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
2
मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
3
मोफत लेखन साहित्य
ई . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
4
शालेय पोषण आहार
ई . १ली ते ५ वी
ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
5
राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
ई . ६वी ते ८ वी
ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
6
मोफत पाठ्यपुस्तके
ई . १ली ते ८ वी
ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
7
मोफत गणवेश योजना
ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
8
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी
SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
9
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी
SC संवर्गातील मुली
10
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
ई. ५वी ते १० वी
SC,VJNT.SBC मुले व मुली
11
परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड )
ई. १० वी
SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
12
अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
13
अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
14
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी
एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
15
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
१०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
16
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५ वी ते ७ वी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
17
मोफत गणवेश योजना
१ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
18
PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी १)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत ३)साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र ५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
19
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
ई . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली २)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .

विविध शालेय स्पर्धा परीक्षा

विविध शालेय स्पर्धा परीक्षा

विविध शालेय परीक्षांची माहिती

अ. क्र.
परीक्षेचे नाव
पात्रता लाभार्थी विद्यार्थी
आवेदनपत्र भरण्याचा कालावधी
परीक्षेचा कालावधी महिना
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना www.mscepune.in
महाराष्ट्र राज्यातील शासनमान्य शाळेत इ. ४थी  मधील विहित वयोगटातील विद्यार्थी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा   www.mscepune.in
ई . ७ वी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा www.mscepune.in
म. रा . ग्रामीण भागातील इ. ४ थी मधील फक्त मुले
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश
परीक्षा www.mscepune.in
आदिवासी क्षेत्रातील रहिवासी असणारे अनुसूचित जमातीचे इ. ४थी मधील फक्त मुले
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
विमुक्त जाती व अ. जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
आश्रमशाळेतील इ. ४थी  मधील विद्यार्थी
ऑगस्ट
फेब्रुवारी / मार्च
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.in
इ . ५ वी
सप्टेबर
फेब्रुवारी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाwww.navodaya.nic.in
इ. ८ वी
सप्टेबर
फेब्रुवारी
सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा (सातारा )www.sainik.satara.org
इ. ५ वी फक्त मुले
ऑक्टोबर
फेब्रुवारी / मार्च
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज , डेहराडून  www.irmc.org
इ. ७ वी / इ. ८ वी फक्त मुले
जून
जून/डिसेम्बर
१०
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा
इ. ८ वीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १,५०,००० /-
सप्टेबर
नोव्हेंबर ३ रा रविवार
११
श्री शिवाजी मिलिटरी स्कूल , पुणे व नाशिकwww.irmc.org
इ. ४ थीत शिकत असलेला व पालकांचे उत्पन्न रु. १००००/-
सप्टेबर
एप्रिल
१२
सांस्कृतिक प्रज्ञाशोध परीक्षा
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी


१३
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.in
प्राथमिक, माध्यमिक, विहित वयोगटानुसार विद्यार्थी
सप्टेबर
नोव्हेंबर
१४
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यस्तर एनटीएसwww.mscepune.in
राज्यस्तर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी
मार्च
मे
१५
राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा
इ. ५ वी ते ८ वी चे विद्यार्थी
जुलै
जुलै /सप्टेबर
१६
डॉ . होमीभाभा कालवैज्ञानिक परीक्षा
इ. ६वी  ते ९ वी  चे विद्यार्थी
डिसेंबर
सप्टेबर

फेब्रुवारी
१७
गणित ऑलम्पियाड
इ. ९वी , १०वी , व ११ वी

डिसेंबर
१८
एलिमेंटरी /इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा  
इ. ७वी  ते ९ वी  चे विद्यार्थी
जुलै
फेब्रुवारी
१९
क्रीडा प्रबोधिनी पुणे
इ. २री ते ८ वी  
मार्च

२०
मुलांची सैनिकी शाळा
इ. ५वी
ऑक्टोबर
डिसेंबर
२२
गणित
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
जानेवारी
मार्च
२३
गणित
इ. ३री , ४थी , व इ. ६ वी (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ )
जानेवारी
मार्च


टिप :-- या परीक्षांचा कालावधी व नियोजनामध्ये कमी-अधिक बदल होऊ शकतो , यासाठी कार्यालयाच्या वरिष्ठांशी संपर्क साधावा  अथवा संकेतस्थळावरून माहिती घ्यावी