home

ज्ञानरचनावाद घोषवाक्ये .

ज्ञानरचनावाद घोषवाक्ये .



📝📝                                          घोषवाक्यातून  ज्ञानरचनावाद   .                              📝📝📝
         
मित्रांनो , सध्या शालेय प्राथमिक शिक्षणात ज्ञानरचनावाद हा शब्द परवलीचा झाला आहे . जिकडेतीकडे शैक्षणिक संकुला संकुलातून ज्ञानरचनावादाची किलबिल कानी पडत आहे . ज्ञानरचनावादाविषयी अनभिज्ञ असणारे शिक्षक अध्यापन निरक्षर ठरतात की काय अशी परिस्थिती सर्वत्र वेगाने निर्माण होते आहे . संपूर्ण अध्ययन - अध्यापन प्रणालीच ज्ञानरचनावादाच्या आसाभोवती फिरते आहे . ज्ञानरचनावादाचं बोट धरुन चालणाऱ्या शाळा , बीट महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर उठून दिसत आहेत . म्हणून अनेकजन शब्द , विचार . कृतीतून आपापल्या परीने ज्ञानरचनावाद चितारत आहेत . मी ही मला समजलेला ज्ञानरचनावाद घोषवाक्यातून टिपण्याचा प्रयत्न इथे करतो आहे .................................................................
१ ]  ज्ञानरचनावादी वर्ग माझा ,
मैदानाशी जिंके पैजा !
२ ] शिक्षणाची संजीवनी ,
क्रीडा कृती गाणी !
३  ] ज्ञानरचनावादाचे लक्षण ,
स्वगतीने शिक्षण !
४ ] ज्ञानरचनावादाशी जोडू नाते ,
गुणवत्तेचे फिरवू पाते !
५ ] ज्ञानरचनावादाची हमी ,
गळती करी कमी !
६]  ज्ञानरचनावादाचा मूलमंत्र ,
विकसू स्वतःचे तंत्र !
७ ] ज्ञानरचनावादाच्या गर्भात ,
बालकांची भरभराट !
८]  ज्ञानरचनावादी होऊ या ,
गुणवत्तेच्या गावा जाऊ या !
९  ]ज्ञानरचनावादाशी मैत्री ,
घोकंपट्टीला कात्री !
१०  ]ज्ञानरचनावादाचा सूर आळवू ,
कृतीतून ज्ञान मिळवू !
११ ] ज्ञानरचनावादच देईल ,
न्याय प्रत्येक मुलाला !
१२ ] ज्ञानरचनावादी आचरण ,
कला कौशल्यांचे कारण !
१३]  रमू ज्ञानरचनावादाच्या अंगी ,
प्रज्ञादिप लावू जगी !
१४  ]ज्ञानरचनावादाचे पाऊल ,
देई प्रगतीची चाहूल !
१५ ] ज्ञानरचनावादाशी जोडू नाळ ,
विद्यार्थ्यांचे उजळू भाल !
१६ ] ज्ञानरचनावादाची मात्रा ,
मिटवी न्यूनगंडाचा खतरा !
१७]  झुगारु परावलंबनाची छाया ,
हाचि ज्ञानरचनावादाचा पाया !
१८ ] ज्ञानरचनावादाची करणी ,
फुलवी प्रतिभेची धरणी !
१९ ] जिथे अनुभव हाच गुरु ,
तिथेच ज्ञानरचनावाद सुरु !
२० ] ज्ञानरचनावादाचा घेऊ वसा ,
पुसू अप्रगताचा ठसा !
२१]ज्ञानरचनावादाची किमया न्यारी ,
प्रत्येक पंखात बळ भरी !
22 ] ज्ञानरचनावादी शाळा ,
लावी अभ्यासाचा लळा !
२३]  ज्ञानरचनावादाचे तंत्र वेगळे ,
प्रगत होती सारी बाळे !
२४]  ज्ञानरचनावादाची वाट ,
उगवी प्रगतीची पहाट !
२५ ] ज्ञानरचनावादच घडवील ,
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माझा !


२६)मराठी भाषेला महत्त्व आहे फार
    ज्ञानरचनावादाने  लावला शिक्षणाला हातभार .
   
२७)आपल्या राज्यात करावा मराठी भाषेचा मान
     आ आई, त ताई, ऐका सर्व  देऊन कान.
   
२८)कोरा कागद, काळी शाई
    रोज मला शाळेत जाण्याची  घाई.
२९) भाषण करतांना असावी शब्दाची साठवण
     गुणाकार करतांना करावी पाढ्यांची आठवण.
     
३०)   मला  आहे  ज्ञानरचनावादी शिक्षणाची आवड
      मी केली ------ सरांची जि.प शाळेची निवड .
३२)मँडम  आमची छान शिक्षण  देते
    मी हसतखेळत  शिक्षण घेते.
३३)जि.प.शाळेत ज्ञानरचनावादी  गजर
   विद्यार्थी रोज असतात शाळेत हजर.
  
३४)द्राक्षेच्या वेलीवर त्रिकोणी पान
   रचनावादी शिक्षणाने राखला शाळेचा मान.
  
३५)नयनरम्य बागेत नाचत होता मोर
    ज्ञानरचनावादी शिक्षण आले, भाग्य माझे थोर.
३६)वन,टू,थ्री
     ज्ञानरचनावादी शिक्षण एकदम फ्री.
    
३७)हसायचं खेळायचं सर्व काही करायचं
     हसतखेळत शिक्षण घ्यायला कशाला लाजायचं .
३८)शिक्षणाच्या  सागरात भाषा -गणिताची जोडी
      ज्ञानरचनावादी शिक्षण घेण्याची मला लागली गोडी.

३९ काळाबरोबर चालू या !
ज्ञानरचनावादी होऊ या !!
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवू या !!!

४०)ज्ञानदानाने करतो मी कर्तव्यपूर्ती
     रचनावादी शिक्षणाने मिळाली मला स्फूर्ती.....
मित्रांनो , प्रत्येक बी मध्ये रुजण्याचं सामर्थ्य असतं . सारा वृक्ष एका बी त सामावलेला असतो .पण जोपर्यंत ओलसर माती आणि दमट हवामान उपलब्ध होत नाही , तोपर्यंत बी रुजू शकत नाही . ती तशीच पडून राहते .हाच न्याय बालकांनाही लागू होतो . प्रत्येक मूल स्वतःच ज्ञानरचियेता असते . पण त्याला पोषक वातावरण प्राप्त झालं नाही तर त्याची अवस्था न रुजणाऱ्या बी प्रमाणे होते .
बालकांना फुलण्यासाठी \ आत्माविष्कारासाठी अनुकूल \ पूरक परिस्थिती निर्माण करुन देणं म्हणजेच ज्ञानरचनावाद होय .
सुरक्षित \ बिनधोक वाढण्यासाठी रोपट्यांना जशी कुंपनाची तशी बालकांना संस्काराची गरज असते , हे ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे .

No comments:

Post a Comment