home

मनोगत

 

मनोगत

       आदरणीय  शिक्षक बंधू भगिनींनो,

                             सप्रेम नमस्कार

                                  

       बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक मित्र हा  ब्लॉग प्रसिध्द करताना मला विशेष आनंद होत आहे . मुख्याध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या  दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा छोटासा प्रयत्न आहे.

      मुख्याध्यापक , शिक्षक यांना मार्गदर्शन व्हावे. त्यांना सर्व शैक्षणिक शालोपयोगी माहिती ,महत्वाची संकेतस्थळे ,उपक्रम ,उपयुक्त फोटो ,व्हिडीओ,महत्वाच्या लिंक्स एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात हा ब्लॉग निर्मितीमागचा हेतू.

      ज्ञानार्जनाच्या या कार्यात मार्ग दाखवणारे शिक्षक हेच खरे मार्गदर्शक असतात .बंधुनो आपली ही मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हा ब्लॉग आपणास वेळोवेळी  उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे  .

           बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक मित्र  हा ब्लॉग निर्मितीसाठी  प्रेरणा देणारे माझी पत्नी सोनाली ,मुलगी  सायली,मुलगा विभव,महाराष्ट्र अड्मिन ग्रुप ३९ मधील माझे काही मित्र श्री .रवी भापकर ,उमेश खोसे ,प्रदिप कुंभार सर ,माझ्या शाळेतील पालक  सचिन भोसले ,आर/दक्षिण विभागाच्या सन्मानीय प्रशासकीय अधिकारी मनीषा सनवार ,विभाग निरिक्षक श्री .हेमंत संखे सर या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे .

      बंधुनो प्रत्येक माणूस हा परिपूर्ण नसतोच, तरीपण तो प्रयत्न करत असतो .या ब्लॉग मध्ये काही बाबी अपूर्ण असतील तर मोठ्या मनाने व  उदार अंत:करणाने समजून घ्याल व आपणास आढळणऱ्या उणीवा व आपल्या मौल्यवान सूचना मला कळवून सहकार्याची साथ द्याल हिच अपेक्षा.

           आपल्या  या ज्ञानवादाच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा ..........................

                           

No comments:

Post a Comment