home

Thursday, 28 April 2016

पायाभूत चाचणीत गुणासाठी द्यावयाची श्रेणी

पायाभूत चाचणीत गुणासाठी द्यावयाची श्रेणी


पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...        
💎💎💎💎💎💎💎💎

🌷इ.२री साठी 🌷

💎  २४ ते ३०   -    अ              
💎  १८ ते २३    -   ब
💎  १२ ते १७    -   क
💎   ० ते११      -   ड
                          श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎

🌷इ.३री ४थी 🌷

🎯३२ ते ४०     -  अ
🎯२४ ते ३१      -  ब
🎯१६ ते २३     -    क
🎯० ते १५        -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷५ वी ६ वी साठी 🌷

🚩    ४०ते ५०    -    अ
🚩   ३० ते ३९   -     ब
🚩   २० ते २९    -   क
🚩   ० ते १९     -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷७ वी ८ वी साठी🌷

🎯  ४८ ते ६०     -  अ
🎯  ३६ ते ४७   -    ब
🎯  २४ ते ३५     -  क
🎯   २३ ते ०     -   ड

💎💎💎💎💎💎💎💎

       श्रेणीनिहाय निकाल तयार करावा...

Monday, 25 April 2016

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

��������������������������������

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

 ��१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
��२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
��३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.

✏लेखनाचे उपक्रम

✒१)धुळपाटीवर लेखन
✒२)हवेत अक्षर गिरविणे.
✒३)समान अक्षर जोड्या लावणे.
✒४)अक्षर आगगाडी बनवणे.
✒५)पाहुणा अक्षर ओळखणे.
✒६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
✒७)बाराखडीवाचन करणे.
✒८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
✒९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
✒१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
✒११)कथालेखन करणे.
✒१२)कवितालेखन करणे.
✒१३)चिठठीलेखन करणे.
✒१४)संवादलेखन करणे.
✒१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

��गणित

��१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
��२)वर्गातील वस्तु मोजणे
��३)अवयव मोजणे
��४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
��५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
��६)आगगाडी तयार करणे
��७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
��८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
��९)अंकाची गोष्ट सांगणे.
��१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
��११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
��१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
��१३)बेरीजगाडी तयार करणे.
��१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
��१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
��१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा

Sunday, 24 April 2016

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक


डिजिटल शाळा  : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा.

     पण आताचे शिक्षक पाढे पाठ करून घेण्यासाठी आधी ते मोबाईलवर रेकॉर्ड करतात, मग विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात.

    काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वत:च डिजिटल धडे पीपीटी च्या साहाय्याने तयार करतात. काही शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत. काही ठिकाणी संगणक प्रयोगशाळा (computer lab) आहेत. बरेच उत्साही शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात.

   डिजिटल शाळा, डिजिटल शिक्षक!

जिल्हा परिषदेच्या शाळाही कात टाकताहेत. काही शाळांनी अाय एस ओ मानांकनही मिळवलंय. बऱ्याच तरुण शिक्षकांनी स्वत: कष्टाने, अभ्यासपूर्वक वेबसाईटसची निर्मिती केली अाहे. हे सर्व चित्र निश्चितच् अाशादायक अाहे. कारण अाजचा शिक्षक कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील.

    शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे. त्यादृष्टीने पुढील माहिती उपयोगी पडेल.

१. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर (google)play store हा अायकॉन असतो. त्यावर ई-मेल अाय डी सेट केला की हजारो apps चे भांडार खुले होते. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असल्यास paid apps विकत घेऊन डाऊनलोड करता येतात. बऱ्याच free apps ही अाहेत. मराठी मूळाक्षरांसाठी varnamala lite ही फ्री अॅप अाहे. Book creator हे अॅप्लिकेशन वापरून डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करता येते. सध्या बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे android tablets अॅनिमेटेड स्वरुपात अभ्यासक्रम प्री-लोड करुन देतात. पण book creator या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शिक्षक स्वत: डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करू शकतात व google play store वर फ्री डाऊनलोडसाठी ठेऊ शकतात.

२. www.youtube.com ह्या वेबसाईटवर व्हिडीअोज शेअर करता व बघता येतात. M S Excel, Powerpoint, Word यावरील फाईल्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडीअोज बघता येतात. Animated videos, cartoons, rhymes, मराठी कविता, गाणी, learning English असे विद्यार्थी व शिक्षकांना उपयोगी लाखो व्हिडीअोज यावर अाहेत.

३. परदेशात अायफोन, अायपॅड व अायपॉड चा शिक्षणासाठी अनेक शाळांमधून वापर होत अाहे. मराठी मधून फारच कमी apps असल्यामुळे अापल्याकडे त्याचा वापर केला जात नाही. परंतु भविष्यात अायपॅडचा वापर वाढण्याची शक्यता अाहे. i-Mac किंवा macbook वर ibooks store हे अॅप्लिकेशन तर जबरदस्त अाहे. यावर चित्र, अावाज, टेक्स्ट, व्हिडीओ च्या साहाय्याने digital धडे किंवा पुस्तक तयार करता येते. अधिक माहितीसाठी www.apple.com/in/ला भेट द्या.

४. फेसबुक वर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक ग्रुप्स अाहेत. त्यावर शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना मिळू शकते.

५. भारतातील व परदेशातील शैक्षणिक तंत्रज्ञानासंबंधी उपयुक्त माहिती पुढील वेबसाईटवर मिळू शकते.

   1) www.emergingedtech.com

   2) www.edtechreview.in

   3) www.khanacademy.org

   4)  www.thefreemath.org

   5) www.teachersofindia.org

   6)www.teachersastransformers.org

   7) www.ciet.nic.in  

 

Tuesday, 19 April 2016

विषयनिहाय वेळेचा भारांश

विषयनिहाय भारांश व आठवड्यातील तासिका

विषयनिहाय वेळेचा भारांश खाली दिलेला आहे. आठवड्यातील तासिका काढण्यासाठी भारांशच्या अर्ध्या तासिका आहेत.


विषयनिहाय वेळेचा भारांश


अ. क्र.

प्राथमिक स्तर (ई . १ली ते २ री )

शेकडा भारांश

1

प्रथम भाषा

36

2

इंग्रजी

12

3

गणित

24

4

कार्यानुभव

10

5

कला शिक्षण

8

6

शारीरिक शिक्षण

10




एकूण


100%

अ. क्र.

प्राथमिक स्तर (ई . ३री ते ४थी )

शेकडा भारांश

1

प्रथम भाषा

26

2

इंग्रजी

12

3

गणित

16

4

परिसर अभ्यास (भाग १ व २)

18

5

कार्यानुभव

10

6

कला/संगीत

8

7

शारीरिक शिक्षण

10

एकूण


100

अ. क्र.

प्राथमिक स्तर (ई . ५ वी )

शेकडा भारांश

1

प्रथम भाषा

14

2

द्वितीय भाषा

8

3

तृतीय भाषा

14

4

विज्ञान

12

5

गणीत

14

6

सामाजिक शास्त्रे

14

7

कार्यानुभव

8

8

कला/संगीत

8

9

शारीरिक शिक्षण

8

एकूण


100

अ. क्र.

प्राथमिक स्तर (ई . ६वी ते ८वी )

शेकडा भारांश

1

प्रथम भाषा

14

2

द्वितीय भाषा

8

3

तृतीय भाषा

14

4

विज्ञान

12

5

गणीत

14

6

सामाजिक शास्त्रे

14

7

कार्यानुभव

8

8

कला/संगीत

8

9

शारीरिक शिक्षण

8

एकूण


100